logo

शेगाव येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची महत्वपुर्ण बैठक संपन्न

वसीम शेख AIMA news बुलढाणा
शेगाव येथे महत्वपुर्ण बैठक संपन्न
शेगांव शहरातील संत निवृत्ती महाराज सभागृह येथे २७/३/२०२४ रोजी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या समर्थकांची अतिशय जोशपूर्ण वातावरणात महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीला असलेल्या समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत 'लढायचं आणि जिंकायचं' असा निर्धार केला.येत्या दि. २ एप्रिल रोजी शेतकरी, कष्टकरी,तरुण व सर्वसामान्य जनतेच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीसाठी रविकांत तुपकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या दिवशी होणारी सभा हीच आपली मुख्य सभा असणार आहे.त्यामुळे या सभेला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून 'धनशक्ती विरुद्ध जनशक्ती' अशा होणाऱ्या लढाईत सहभागी होवून आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकरांनी केले.

7
1126 views